गोवा, बिहारमध्ये सत्ता बदल?

0

हैदराबाद – गोवा काँग्रेसच्या नेत्यांनी आपण निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावे असे निवेदन गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिले. काँग्रेसचे १३ आमदार गोव्यातील राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपण एकमेव मोठा पक्ष असल्याचे पत्रक सुपूर्द केले. यासोबतच बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही आपण इतर पक्षांसोबत मिळून बहुमत सिद्ध करणार असल्याचा दावा केला आहे.

ज्याप्रमाणे कर्नाटकाच्या राज्यपालांनी सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले त्याप्रमाणे गोव्याच्या राज्यपालांनी आपल्याला आमंत्रण द्यायला हवे. गोव्यात आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असे यतीश नाईक यांनी यांनी सांगितले. आम्ही राज्यपालांसमोर आपले बहुमत सिद्ध करू. इतर पक्ष व त्यांच्या आमदारांना सोबत घेऊन आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.