लखनौ – भगवान राम आणि श्रीकृष्णदेखील राजकारण करायचे. मात्र, त्यांच्या राजकारणाचा उद्देश ‘रामराज’ प्रस्थापित करण्याचा होता, असे केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे राजनाथ म्हणाले, राजकारण भ्रष्ट नेत्यांच्या हाती गेले, तर संपत्ती अराजक तत्वांच्या हातात विपत्तीचे माध्यम बनते. राजकारण जशा लोकांच्या हाती जाईल तसे बनेल.
समाजाला राजकारणाची योग्य परिभाषेचा समजवा आणि देशाला योग्य मार्गावर आणणाऱ्या राजकारणाची निर्मिती करा. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांनीही राजकारण केले होते. मात्र त्यांच्या राजकारणात चारित्र्य आणि मुल्यांप्रती समर्पण होते. असे त्यांनी सांगितले.
राजकारण अनंतकाळापासून सुरू आहे. मात्र, आज राजकारणाची परिभाषाच बदलली आहे. कुणी नेत्यांना चोर म्हणते तर कुणी घुसखोर म्हणत आणि राजकारणावर टीका करत, असेही राजनाथ म्हणाले. राजनाथ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने (एबीवीपी) इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या, ‘२१ व्या शतकात भारताच्या विकासात युवकांची भूमिका’ या विषयावरील एका सेमिनारमध्ये बोलत होते.