जागतिक परिचारीका दिनानिमीत्त घेण्यात आला कार्यक्रम
जळगाव: येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात बीएससी तृतीय वर्षातर्फे रविवारी १२ रोजी जागतिक परिचारीका दिनानिमीत्त ‘लाइव्ह सोलफुली २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नर्सिंगच्या विद्यार्थ्यानी मोठा उत्साहात जागतिक परिचारीका दिन साजरा केला. जगातील पहिल्या परिचारीका फ्लोरेन्स नाइटेंगल यांचा रविवारी १२ मे रोजी १९९ वा जन्मदिवस असुन हा दिवस जागतिक परिचारीका दिन म्हणून साजरा केला जातो. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातही बीएससी तृतीय वर्षातर्फे फ्लोरेन्स नाइटेंगल यांच्या १९९ व्या जयंतीनिमीत्त लाइव्ह सोलफुली २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, सुभाष पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड,मेट्रन कोंडल, प्राचार्य रविंद्र पुराणिक, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, प्रा.अनिषकुमार व्ही, प्रा विशाखा गणविर, प्रा प्रशिक चव्हाण, प्रा रश्मी टेंभुर्णे, यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
सेवेबाबत घेतली शपथ
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या आवारातील डॉ. केतकी पाटील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. विद्यार्थ्यांनी सेवेची शपथ ग्रहण केली. फ्लोरेन्स नाइटेंगल यांच्या जीवनचरित्रावर आधारीत माहिती देतांना मान्यवरांनी सेवेचा आदर्श उभी करणारी देवता होती. परिचारीका व्यवसायात कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नाइटैंगल यांचा आदर्श डोळयासमोर ठेवावा असे सांगीतले. नाइंटेंगल यांच्या जिवनावर आधारीत पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन फित कापून करण्यात आले. त्यानंतर बीएससी आणि जीएनएम प्रथम वर्षाचे विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहीत गवई, देविका बांद्रे, तर आभार सोहील पटेल यांनी मानले या कार्यक्रमासाठी बीएससी तृतीय वर्षाचे स्नेहल चव्हाण, आकाश धनगर, योगीता पाटील, वैष्णवी माळवी, स्वरूपा कामडी, प्रणाली हिरडे, विकास सनांसे, निकीता निकम, प्रिया बालपांडे, गीता घुगे, यांचेसह विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.