२६ लाख रुपये किमतीचे सोन्याची बिस्किटे जप्त

0

मुंबई – सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मुंबई विमानतळावर सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. जप्त केलेली ८ बिस्किटे ही प्रत्येकी १० ग्रॅमची असून या सर्वांची एकूण किंमत ही २६ लाख ६ हजार ३२ रुपये आहे.

सोन्याची बिस्किटे जेट एयरवेजच्या विमानातील शौचालयाच्या समोरील कचऱ्याच्या डब्यातुन जप्त करण्यात आली. हे विमान शनिवारी दुबईवरुन मुंबईला आले होते.