नवी दिल्ली- जागतीक बाजारातील मंदी व सोन्याचे व्यापाऱ्यांकडून मागणीचे प्रमाण घटल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅममागे ३०० रुपयांनी कमी झाला आहे. सतत तीसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ३०० रुपयाच्या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम ३१ हजार ६०० रुपये झाले आहे. सोबतच चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदी १०० रुपयांनी कमी झाली आहे. घसरणीसह चांदीचे दर ४० हजार ५०० रुपये किलोमागे आहे.