भुसावळ प्रतिनिधी दि 21 चोपडा तालुक्यातील अकुलखेडा व चहार्डी फाट्या जवळील सौभाग्य लॉन येथे सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेल्या ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घडली आहे…
तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी असलेले देवेंद्र नारायण चौधरी यांच्या मुलीचा अकुलखेडा जवळील सौभाग्य लॉन्स मध्ये येथे साखरपुड्याच्या कार्यक्रम होता. त्याठिकाणी देवेंद्र चौधरी यांच्या मुलीचे व पुतणीचे ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोन्या चांदीच्या दागिने ठेवलेली पर्स आजीकडे ठेवली होती. ती पर्स घेऊन आजी सोफ्यावर बसलेल्या असताना पर्स सोफ्यावर बाजूला ठेवली. तेवढ्यात एका अज्ञात चोरट्याने ती पर्स लंपास करत पोबारा केल्याची घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घडली आहे. देवेंद्र नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहे. * शहरात सामान्य नागरिकांना मध्ये घबराट*
चोपडा शहरात मागील काही दिवसापासून रोजच छोट्या मोठ्या चोऱ्या सुरू आहेत. मेन रोड, कॉलनी परिसरात अश्या विविध ठिकाणी चोरी होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र चांगलेच भयभीत झाले आहेत. याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन चोरीचा छळा लावायला हवा.
असेही जनमानसात बोलले जात आहे.
पोलीस सडेतोडगाडी व कर्मचारी जास्तीचे दयावे
चोपडा शहर पोलीस स्टेशनची हद्द मोठी येऊन जाते व कर्मचारी त्या
हिशोबाने फारच कमी असल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच
इतक्या मोठी हद्दीत एकच गाडी पेट्रोलिंग करत असते. त्यामुळे पोलिसां चकामा देऊन चोरटे रोजच चोरी करत आहेत. त्यामुळे वरिष्ठानी जातीने लक्ष देऊन कर्मचारी व नवीन गाडी दयावी ही मागणी होत आहे
मगलसिंगची आठवण –
चोपडा शहरात अमळनेर तालुक्यातील रहिवाशी मंगलसिंग नावाचे पोलीस निरीक्षक होते. हे स्वतः पेट्रोलिंग करत असताना कुठेही गाडीतून उतरून सायकलवर पेट्रोलिंग करत कोणत्याही गल्ली बोळात जात असत. आणि आपली ड्युटी करत असत. त्यासोबतच रोज वेगवेगळे पेहराव करत असल्याने रात्रीच्या वेळेस पोलीस निरीक्षक मगलसिंग आहेत हे चोपडा वासीय सुध्दा ओळखत नसत. आणि त्या माणसाच्या दरारा वेगळाच होता.