नवी दिल्ली- आज स्टॉक मार्केटची सुरुवात चांगली झाली. कामकाज सुरु झाल्यानंतर तेजी पाहावयास मिळाली. बँकिंग, ऑटो, मेटल आणि रियल्टीच्या शेअरमध्ये अधिक खरीदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स 200 अंकांनी वाढले तर निफ्टी 50 अंकांनी वाढले. सेन्सेक्स 37805.25 वर पोहोचले तर निफ्टी 11,427.65 वर पोहोचले. आयसीआयसीआय बँक, रिलायंस इंडस्ट्रीज, एक्सिस बैंक, एसबीआई, एचडीएफसी बँकच्या शेअरमुले बाजारात तेजी पाहायला मिळाली. फार्मा आणि एफएमसीजीचे शेअरमध्ये मंदी पाहावयास मिळाली.
निफ्टीचा उच्चांक
१ ऑगस्टला निफ्टी ११,३९०. च्या नवीन उच्चांकावर होते.
६ ऑगस्टला निफ्टी प्रथम ११,४०० च्या स्तरावर पोहोचले.
३१ जुलैला निफ्टी ११,३६६ वर होते.
३० जुलैला निफ्टी ११,३०० वर होते.