गुगल म्हणतो, देशातील सर्वात ‘बॅड चिफ मिनिस्टर’ केरळचे !

0

थिरूवनंतपुरम-आजकाल एखाद्याला कोणताही प्रश्न नडला की त्याचे उत्तर थेट गुगलवरून मिळविले जाते. प्रश्न असेल किंवा समस्या याचा समाधान गुगलद्वारे होत आहे. दरम्यान आता गुगलवर देशातील सर्वात वाईट मुख्यमंत्री कोण? असे सर्च केल्यास केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचे नाव समोर येते.

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यासाठी सध्याचा काळ खरच खूप वाईट आहे. कारण शबरीमला मंदिरात महिला प्रवेशावरुन निर्माण झालेल्या वादंगाचा त्यांना सामना करावा लागतो आहे. महिलांना प्रवेश दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा रोष देखील त्यांना पत्करावा लागतो आहे.

काल गुगलवर २०,००० पेक्षा जास्त वेळा ‘बॅड चिफ मिनिस्टर’ सर्च करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक वेळी पिनरायी यांचे विकीपेडीया पेज ओपन होत होते. दरम्यान, हे काम विरोधक करत असल्याचे आरोप पिनरायी समर्थक करत आहे.