पुणे-आजकाल एखाद्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीपेक्षा गूगलने सांगितलेल्या गोष्टीवर अधिक विश्वास ठेवला जातो. गुगल सांगेल तेच खरे अशी समाज आज झाली आहे. परंतु गुगल देखील एखादी माहिती देण्यात मोठी गफलत करू शकतो याचा प्रत्यय गुरुवारी इंटरनेट वापरकर्त्यांना आला. गुगल सर्च इंजिनवर भारताचे पहिले पंतप्रधान कोण असे सर्च केल्यास पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असे बरोबर सांगतो मात्र त्याच वेळी छायाचित्र हे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दाखविले आहे. गुगलकडून हे नजर चुकीने झाले आहे, मात्र नेटीझन्ससाठी हा विषय मजेचा ठरतो आहे. सोशल मीडियात यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. नेटीझन्स याचे स्क्रीन शोर्ट काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहे.