‘प्रभावी आवाज हरपला’; जॉर्ज फर्नांडिस यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली !

0

नवी दिल्ली – माजी संरक्षण मंत्री समाजवादी, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे आज मंगळवारी २९ जानेवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय तसेच विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. जॉर्ज फर्नांडिस यांना दिग्गज मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फर्नांडिस यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. जॉर्ज साहेबांनी भारताच्या सर्वोत्तम राजकीय नेतृत्वाचे प्रतिनिधित्व केले. सरळ आणि दूरदृष्टीने त्यांनी देशात योगदान दिले आहे. गरीब आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ते सर्वात प्रभावी आवाज होते. त्यांच्या निधनाने अतीव दुःख झाले असल्याचे मोदी म्हटले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या जाण्याने खूप दुःख झाले, त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांची साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी नेहमी लक्षात राहील अशा शब्दात राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील शोक व्यक्त केले आहे. माजी संरक्षणमंत्री श्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या जाण्याने अति दु:ख झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.