पुणे: लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असून आम्ही त्याचा गांभीर्याने अभ्यास करणारआहोत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत केली त्यांचे धन्यवाद देतो असेही त्यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सांगितले.
यापुढेही निकालाची चिंता न करता दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांना मदत करणार असून, २०१४ च्या निवडणुकीत ज्या प्रमाणात भाजपाला मतदान मिळाले होते ते २०१९ च्या निवडणुकीत कमि झाले आहे. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार खूप कमी फरकाने पराभूत झाले आहे. त्याचा आम्ही गांभीर्याने अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आम्ही जनसंपर्क ठेऊन जनाधार वाढवणार आहोत, असेही ते म्हणाले.
मावळची जागा राष्ट्रवादीने कधी जिंकली नव्हती, त्यादृष्टीने आम्ही तिथे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अस भाष्य पार्थ पवार यांच्या पराभवावर त्यांनी केले. राज ठाकरे यांच्या सभांचा राष्ट्रवादी ला फायदा झाला का या वर पवार यांनी बोलणे टाळले.