राज्यपाल भाजपच्याच बाजूने निर्णय देणार-राज ठाकरे

0

मुंबई-कर्नाटकमधे सत्ता स्थापना करण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये रस्सीखेच सुरु असून यावेळी बाजी नेमकी कोण मारणार याकडे लक्ष आहे. एकीकडे भाजपाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ मागितला असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्याच बाजूने जाणार असे म्हटले आहे.

भाजपने केला दावा

कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा पहिला अधिकार आपलाच असल्याचा दावा भाजपाने केला असला तरी, काँग्रेसने जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाशी निवडणुकोत्तर आघाडी करुन बहुमताचा आकडा गाठल्याने नव्या आघाडीलाच सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली पाहिजे असा प्रतिदावा केला आहे.

दोन्ही पक्षांनी सत्तास्थापनेसाठी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेच्या दोऱ्या राज्यपाल बजूबाई वाला यांच्या हाती गेल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी आमदार पद सोडणारे वजूभाई वाला सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी देतात की, काँग्रेस-जनता दलाच्या नव्या आघाडीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देतात हे पुढील दोन दिवसांत ठरण्याची शक्यता आहे. निकालानंतर भाजपा १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक ११२ जागांचे पाठबळ मिळवण्यात तो अपयशी ठरला.