नवी दिल्ली – मोदी सरकारने आज ४ वर्ष पूर्ण केल्यानिमित्ताने भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सरकारच्या कामांची माहिती दिली आहे. ४ वर्षात देशाचा विकास केला. सकारात्मक राजकारण केले आणि सामान्य लोकांपर्यंत विकास पोहोचवला, असे मत शाह यांनी व्यक्त केले.
सरकारने राबविलेल्या योजना व राजकीय वाटचाल
*आम्ही घराणेशाहीचे राजकारण संपवले.
*सरकारी पेंशनची कमीत कमी मर्यादा एक हजार केली.
*बाग शेतीतील उत्पादनात १५ टक्के वाढ.
*दाळीच्या उत्पादनाच वाढ, दाळीचे भाव स्थिर.
*कृषी विकास दर ४.९ टक्के केला.
ई-नामच्या माध्यमातून कृषी बाजार सुरू केला.
*माती आरोग्य कार्डचा प्रयोग केला.
*पंतप्रधान कृषी सिंचन योजना.
*नीम कोटेड युरियाचा प्रयोग.
*परदेशी चलन भंडार मोठ्या प्रमाणात वाढवले.
*थेट विदेशी गुंतवणूक वाढवली.
*चलन फुगवटा ४.५८ टक्के झाला, तो आधी ८ टक्के होता.
*बेनामी संपत्तीविषयी कठोर कायदा लागू केला.
*जीएसटीचे ऐतिहासिक यश, एक राष्ट्र, एक बाजार संकल्पना.
*थेट कर भरणा वाढला.
*डिजीटल पेमेंट व्यवस्थेत वाढ.
*रुपये डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरू केले.
*मोबाईल बनवणाऱ्या १२० कंपन्या भारतात, वर्षाला २२ कोटी मोबाईलची भारतात निर्मिती.
*बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना सुरू केली.
*तिहेरी तलाकला बंदी केली.
*महिलांना एकट्याने हजला जाण्यास परवानगी.
*दावोसमध्ये भारताची प्रतिष्ठा वाढवली.
*जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली.
*पॅरिस जलवायु संमेलनात भारताची मोठी भूमिका, विश्वाने त्याला स्विकारले.
*निवडणूक सुधारणा करून निवडणूक बाँड लागू.