शरद पवारांच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात; सरकारवर घणाघात !

0

मुंबई: राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात हजर राहून आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्याची भूमिका घेतली आहे. आज दुपारी शरद पवार स्वत: हून ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरून भाजप सरकारला लक्ष केले आहे. राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली असल्याचे आरोप केले आहे.

शरद पवार हे महाराष्ट्रातील बलाढ्य विरोधी नेते असल्यानेच सरकारने त्यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारवाई केली असल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे.

https://janshakti.online/new/sharad-pawar-going-to-ed-office-but-ed-officer-not-meet-pawar/