‘मिडल क्लास’ला मिळणार दिलासा ; करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाख होणार

0

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून लवकरच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुपटीने वाढवण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी ही मर्यादा अडीच लाखाहून पाच लाखांवर जाणार असून यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय आणि परिवहन भत्ता देखील पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता आहे. नोटाबंदीमुळे चिंताग्रस्त झालेल्या मध्यवर्गाला या निर्णयामुळे दिलासा मिळू शकतो.