राफेल प्रकरणी सरकारने कोर्टाला दिली व्यवहाराची माहिती

0

नवी दिल्ली –राफेल करारावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. कॉंग्रेसने तर थेट पंतप्रधान मोदींनाच लक्ष केले आहे. दम्यान राफेल विमान करारप्रकरणी केंद्र सरकारने आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. राफेल विमान खरेदीच्या निर्णयासंबंधीच्या प्रक्रियेबाबतची माहिती देणारी कागदपत्रे केंद्र सरकारने याचिकाकर्त्यांना सोपवली आहेत. या शपथपत्रामधून सरकारने राफेल विमान खरेदी करारासाठी अमलात आणण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेची माहिती न्यायालयाला दिली.

फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची खरेदी करताना संरक्षम सामुग्री खरेदी प्रक्रिया २०१३ चे पालन करण्यात आले, होते अशी माहिती सरकारने या शपथपत्रामधून दिली आहे.