राजकीय भावनेने माझी प्रतिमा खराब करण्याचे काम सरकार करत आहे-रॉबर्ट वड्रा

0

नवी दिल्ली-कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई रॉबर्ट वड्राने राजस्थानमधील बीकानेरमध्ये जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भात मिळालेल्या समन्स विषयी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय हेव्यादाव्यापोटी सरकार माझ्या मागे लागली आहे असे आरोप रॉबर्ट वड्राने केले आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचे काम सरकारच्या अजेंड्यावर आहे असे आरोपही रॉबर्ट वड्राने केले आहे.

रॉबर्ट वड्राने फेसबुकवर पोस्ट केली आहे. मागील साडेचार वर्षापासून मी चौकशीत सहकार्य करत आलेलो आहे आणि यापुढे देखील सहकार्य करेल असे आश्वासन रॉबर्ट वड्राने दिले आहे. २४ तासात मला दोन वेळा समन्स पाठविण्यात आले ही मोठी आश्चर्याची बाब आहे, यावरून राजकीय भावनेने माझ्यावर कारवाई होत असल्याचे दिसून येते असे आरोप रॉबर्ट वड्राने केले आहे.