५० ते ९० टक्के कमी दराने औषधी मिळतील

0

नवी दिल्ली-देशातील नागरिकांना कमी किमतीत औषधी मिळावी यासाठी औषधींची किमती कमी करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. कमीत कमी किमतीत औषधी देण्याचा निर्णय करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पंतप्रधान आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान जन औषधी परियोजनेबद्दलची माहिती देत आहे. देशभरातील लाभार्थ्याशी ते अॅपद्वारे यावेळी संवाद साधणार आहे.

चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी औषधी स्वस्त करणे व डॉक्टरांची संख्या वाढविण्याचे काम सरकार करीत असल्याची माहिती पंतप्रधान यांनी दिली. जन औषधी केंद्रात जवळजवळ ५० ते ९० टक्के कमी दराने औषधी मिळतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली.

गुडघे प्रत्यारोपणासाठी खर्च कमी

सोबतच गुडघ्याचा अनेकांना आजार असतो. गुडघे प्रत्यारोपणाची आवश्यकता अनेकवेळा भासते. याचा विचार करून गुडघे प्रत्यारोपणासाठी येणारा खर्च कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ६० टक्के खर्च गुडघे प्रत्यारोपणासाठी कमी करण्यात आले आहे. भारतात दरवर्षी १ ते १.५ लाख रुग्णांचे गुडघे प्रत्यारोपण होत असते.