नवी दिल्ली । ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदी सरकारने एक गुड न्यूज दिली आहे. ‘पंतप्रधान वय वंदना योजने’अंतर्गत ज्येष्ठ नागरिक 15 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यातून त्यांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. एवढच नव्हे तर या योजनेची अंतिम तारीख 4 मे 2018 वाढवून ती 31 एप्रिल 2018 करण्यात आली आहे. याआधी या योजनेअंतर्गत 7.5 लाख रुपये गुंतवणूक करता येत होती. केंद्रीय कॅबिनेटच्या मंजूरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2017 साली या पेन्शन योजनेला सुरूवात केली होती. ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने ही योजना तुम्हाला घेता येऊ शकते. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पासून या योजनेला सवलत देण्यात आली आहे. पेंशन घेण्याच्या 3 वर्षांनतर कॅश गरज पूर्ण करण्यासाठी खरेदी किंमत 75 टक्के कर्ज घेता येऊ शकते. पेंशनधारक पॉलीसी दरम्यान मृत्यू झाल्या खरेदी मुल्य लाभार्थिंना दिला जाईल. सरकारच्या सबसिडीच्या रुपात एलआयसी ही रक्कम देणार आहे.
एलआयसीकडून 8% रिटर्न
केंद्राने सामाजिक सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान वय वंदना योजना ही भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) तर्फे चालविली जात आहे. 60 वर्षांच्या वरील नागरिकांना सामाजिक सुरक्षा देणे हा यामागचा हेतू आहे. 2018 पर्यंत 2.23 लाख वरिष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.