मुंबई-बॉलीवुड आपल्या अभिनयाने भुरळ पडणारा अभिनेता गोविंदा हा आता त्याच्या मुलाला बॉलीवूडमध्ये लाँच करणार आहे. गोविंदाच्या मुलाचे नाव यशवर्धन आहूजा असे आहे. विदेशात शिक्षण पूर्ण करून यशवर्धन भारतात परतला आहे. गोविंदाला याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले असता त्यांनी देखील याबाबत संकेत दिले आहे. माझे बॉलीवूडमध्ये खूप संघर्ष आहे, माझे स्वत:चे मोठे लाँचिंग झालेले नव्हते, मात्र माझ्या मुलाचे मोठे लाँचिंग व्हावे अशी माझी इच्छा आहे असे गोविंदा यांनी सांगितले.