ग्रामस्वराज्य अभियान यशस्वी; पंतप्रधानांनी मानले आभार

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्राम स्वराज अभियानाला यशस्वी करण्यासाठी लोक प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. पंतप्रधानांनी ट्विटरवर सर्वाचे आभार व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटरवर “ग्राम स्वराज एक्झिशन यशस्वी झाले कारण मंत्र्यांचे, खासदार, आमदार, विविध स्थानिक स्वराज्यांचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे अधिकारी, केंद्र सरकारचे सर्वोच्च अधिकारी, नागरी समाजातील सदस्य यांनी परिश्रम घेतले आहे. या सर्वांचे मी आभारी आहे असे लिहिले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त
पंतप्रधान मोदी यांनी १४  एप्रिल ते ५  मे दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ग्रामस्वराज्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १६ हजार ८५० गरिबांना विविध योजनेचा लाभ दिला आहे. ग्रामस्वराज्य अभियानाच्या २१ दिवसात ७.५३ लाख उज्ज्वला कनेक्शन वितरित करण्यात आले. सुरभ योजना अंतर्गत ५ लाख २ हजार ४३४ कुटुंबांना विद्युतीकरण करण्यात आले.

प्रत्येक १६ हजार ६८२ गावांमध्ये २५.०३ लाख एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले आहे. मिशन इंद्रधनुष अंतर्गत ६४ हजार ३९८ मुले आणि ४२ हजार ७६२ महिलांना लाभ देण्यात आला. २०  लाख ५३ हजार ५९९ जनधन लाभार्थी जोडले गेले. १६ लाख १४ हजार ३८८ प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थी जोडल्या गेल्या होत्या, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये २६  लाख १० हजार ५०६ लाभार्थ्यांचा समावेश आहे.