प्राणी- पक्ष्यांना दररोज पाच लाख लिटर पाणी मिळणार

0

पुणे :- सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे देशातील पहिल्या कार्यान्वित झालेल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातुन तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना आता दररोज पाच लाख लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे तळजाई टेकडी आता वर्षभर हिरवीगार राहण्यास मदत होणार आहे. प्रथमच प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिनीतून मंगळवारी पोहचले. यावेळी राजू धारिया, शैलेंद्र पटेल, सचिन पुणेकर, आर. सी. माहुलकर, आणि वास्तुविशारद महेश नामपूरकर यांच्यासह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

पर्यावरणप्रेमींही सुखावले
आबा बागुल म्हणाले, तळजाई टेकडीवर 107 एकर क्षेत्रात वसुंधरा जैव वैविध्य उद्यान हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून साकारला जात आहे. आजपर्यंत या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी ,प्राणी -पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. विशेषतः आजपर्यंत या टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते. मात्र आज या प्रक्रियेला अडीच किमीच्या जलवाहिनीद्वारे पाणी पोहचले आहे. जैववैविध्य उद्यान प्रकल्पाला या पाण्याचा उपयोग होणार असून या प्रक्रियेमुळे जमिनीत पाणी मुरून भूगर्भातील पाणीसाठाही वाढणार आहे. येथे पाण्याची व्यवस्था आणि टेकडीचे संवर्धन झाल्यामुळे पर्यावरणप्रेमींही सुखावले आहेत. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणाही सुरु होणार आहे.