पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (दि. २५ मे) दुपारी २ वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे ते ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी वेबसाईटवर अर्ज करता येईल. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ५ जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात मिळणार आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसएमएस वर देखील बारावीचा रिझल्ट बोर्डाने उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ५७७६६ या नंबरवर आपला सीट नंबर टाकून मॅसेज सेंड करायचा आहे. मग महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून त्याच मोबाईल नंबरवर निकाल एसएमएस केला जाणार आहे.
ऑनलाईन निकाल कसा पाहणार?
www.mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org