शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवतीर्थ येथे अभिवादन

शहादा – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून ही ऐतिहासिक बाब आहे. म्हणून ३५० वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात येणार आहे.

दोंडाईच्या रोडवरील शिवतीर्थ येथे अभिवादन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, माजी नगरसेवक योगेश चौधरी, अनिल भामरे, ग स बँकेचे संचालक एन डी पाटील, प्रा.डॉ. एस एम पाटील, प्रा.एन एस पाटील, शिवस्मारक समितीचे सचिव किरण सोनवणे, नगीन पाटील, मनोहर सैंदाणे, ऍड सरजू चव्हाण, डॉ. दीपक मोरे, डॉ. नरेंद्र वाघ, चतुर्भुज शिंदे, राजेंद्र पाटील, देवेंद्र बोरसे, भरत पाटील, रवींद्र पाटील, निलेश पाटील, हर्षल साळुंखे, देवेंद्र बोरसे, भय्या पाटील यांच्यासह मोठया संख्येने शिवभक्त उपस्थित होते.