मेहरुणमधील श्रीराम विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

जळगाव l श्रीराम तरुण मित्र मंडळ संचलित श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्राथमिक सुधारणांविषयी माहिती दिली. माध्यमिक विद्यालयाचे सचिव अशोक लाडवंजारी होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संचालक वासुदेव सानप, भगवान लाडवंजारी, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी इखे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष अशोक लाडवंजारी व प्रमुख पाहुणे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने केली. यावेळी ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली. उत्कृष्ट माहिती खुशी राठोड या ७ वीच्या विद्यार्थिनीने यावेळी शिक्षिका संगीता कुलकर्णी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य, त्यांचे शैक्षणिक धोरण, रयतेचा राजा शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातील कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ का साजरा केला जात आहे ? याविषयी माहिती दिली. त्यांचे आरक्षण विषयक धोरण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे याविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सांस्कृतिक प्रमुख प्रतिभा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.