गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला जि. प. सदस्यांनी ठोकले कुलूप
गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकताच शिक्षकांची झाली नियुक्ती
शिंदखेडा(प्रतिनिधी) : तालुक्यातील साहूर या आदिवासी वस्तीच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली झाली , तीन वर्षे होऊन नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात येत नव्हती . या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धमाणे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी अखेर सोमवारी शिंदखेड्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले व त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा भरविताच शिक्षण विभागाला जाग आली व तात्काळ जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील एका शिक्षकाची नियुक्ती कायमस्वरूपी तर दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे.
चार वर्गांच्या या शाळेत दोन शिक्षकांची गरज आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून एकच शिक्षक होते. त्यांचीही बदली झाली. नवीन शिक्षक रुजू झालेले नाही. विद्यार्थी वाऱ्यावर होते. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर शिक्षणाधिकारी
साळुंखे यांनी तत्काळ कायमस्वरूपी एका शिक्षकाची नेमणूक करतो व तात्पुरती दुसऱ्या शिक्षकाचीही नियुक्ती करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आश्वासन पूर्ण नाही झाले तर मंगळवारी पुन्हा कार्यालयाला कुलूप ठोकू आणि जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता.
तीन वर्षांपासून साहूर शाळेत ४ वर्गामध्ये ४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन शिक्षकांची नेमणूक आवश्यक असताना एकच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यांची बदली झाल्याने शिक्षकाशिवाय शाळा होती व विद्यार्थी वाऱ्यावर. या संदर्भात सुनीता सोनवणे यांनी अनेकवेळा आवाज उठवला. प्रशासन मात्र दुर्लक्ष करत होते. याचा निषेध म्हणून सोमवारी सकाळी १० वाजता शिंदखेडा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनाला टाळे ठोकले. यावेळी शानाभाऊ सोनवणे, विद्यार्थी व पालक त्यांच्या समवेत होते. यावेळी शिक्षणाधिकारी साळुंखे यांनी कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूकीचे आश्वासन दिले. आश्वासन पूर्ण न झाल्यास मंगळवारी पुन्हा टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. यानंतर ग.शि. सी.के. पाटील यांनी शिक्षक नियुक्तीचे पत्र दिले. आंदोलनात सरपंच गुलाब सोनवणे, शाना शिरसाठ, सुरेखा सोनवणे, कौतिक कोळी, रमण कोळी, पुंडलिक कोळी, सुनील भिल, संजय कोळी, सेना भिल, हेमराज कोळी, अशोक रोकडे, चिंधा कोळी, कन्हैया कोळी, पंकज कोळी, विलास कोळी, दीपक वडार यांच्यासह विद्यार्थी, पालक व गावकरी सहभागी होते.
*** मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले शिक्षक नियुक्तीचे आदेश–
धमाणे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सोमवारी शिंदखेड्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले व त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा भरविताच शिक्षण विभागाला जाग आली व तात्काळ जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी काढले. हिरालाल रोहिदास दाभाडे यांची बदली शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दाभाडे यांनी साहोर येथील जिल्हा परिषद शाळेत हजर राहण्याचे आदेश 31 जुलै 2023 रोजी काढले आहेत. तर झोटवाडे जिल्हा परिषद शाळेत नियुक्त शिक्षक गणेश शंकर इसी यांची विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात साहूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत गणेश ईशी यांनी साहूर जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे काम करावे असे आदेशात म्हटले आहे गणेश विषयांचा नियुक्ती आदेश गटशिक्षणाधिकारी सी के पाटील यांनी काढला आहे.
*** शानाभाऊ सोनवणे (उपजिल्हा प्रमुख,उबाठा शिवसेना)–+ गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांनी अनेक वेळा जिल्हापरिषद सभागृहात साहूर गावाला ४५ मुलांच्या मागे एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरीही शिक्षण विभागाने लक्ष दिले नाही त्यात त्या शिक्षकाची देखील बदली झाली व नवीन शिक्षक एकच दिवस आला नंतर आलेच नाही म्हणून शिक्षणाधिकारी साहेबांना अनेक वेळा सांगून लक्ष दिले नाही म्हणून कार्यालयाला कुलूप ठोकले आंदोलन चालू असताना सी के पाटील यांनी एका शिक्षकाची नियुक्ती केली
दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती संध्याकाळी तात्काळ केली
त्यामुळे पालक विद्यार्थी प्रचंड आनंदीत झाले आम्हाला ही दोन्ही पती पत्नी ना आनंद झाला परंतु तालुक्यात अजून ११४ शिक्षकांची पद रिक्त आहेत ती तात्काळ भरली जावीत अशी अपेक्षा