पालकमंत्री बापट यांनी पिंपरी-चिंचवडच्या आमदारांना ठोकला सलाम

0

पुणे – पिंपरी चिंचवड कुणाचे हा राजकीय प्रश्न कायम चर्चेत राहिला आहे. त्यातच अधूनमधून शहरात येणारे पालकमंत्री गिरीश बापट हे मीच सर्वेसर्वा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांनी चक्क पिंपरी चिंचवडच्या दोन आमदारांना सलाम ठोकाल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील स्वतंत्र आयुक्तालया संदर्भाच्या बैठकीला बापट आले शहरात आले होते. यावेळी त्यांनी बैठकस्थळी येताच आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना चक्क ‘सॅल्युट’ मारला. पालकमंत्र्यांनी अचानकपणे केलेल्या अँक्शनमुळे आमदार जगताप आणि लांडगे दोघेंही गोंधळून गेले. तर उपस्थित असलेले देखील चक्राऊन गेले होते.