ट्रक उलटल्याने १९ ठार; ७ जखमी

0

बवायली :– भावनगर- अहमदाबाद महामार्गावर आज सकाळी सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने १९ जण ठार झाल्याची घटना घडली. तर ७ जण जखमी झाले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


 

अपघात घडल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.हे सर्व लोक एका सिमेंटच्या ट्रकमधून प्रवास करत होते. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.