३१ ऑक्टोंबर रोजी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे उद्घाटन

0

अहमदाबाद- जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून गणना होणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

हा पुतळा उभारण्यासाठी ३५०० कामगार आणि २५० इंजिनिअर दिवस-रात्र मेहनत घेत होते. सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे