गांधीनगर-गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या रेल्वेमध्ये हत्या करण्यात आली. काल रात्री उशिरा हा हत्याकांड घडला. जयंती भानुशाली सयाजी नगरी रेल्वेमधून भुजहून अहमदाबादला जात होते.
रेल्वे गाडी मालिया येथे पोहोचली असता आरोपींनी एसी डब्ब्यात घुसून भानुशाली यांच्यावर गोळया झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. भानुशाली गुजरात भाजपाचे माजी उपाध्यक्ष होते तसेच ते कच्छच्या अबडसा विधानसभा मतदारसंघातून २००७ ते २०१२ दरम्यान आमदारही होते.
जयंती भानुशाली यांच्यावर मागच्यावर्षी एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी गुजरात भाजपा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.