पेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार – गुलाबराव देवकर

0

जळगाव – लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना आज (दि.१६) भेटण्यासाठी ईपीएस ९५ पेन्शनर्स संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात त्यांनी श्री.देवकर यांच्याशी चर्चा केली. दरम्यान माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही पेन्शनधारकांना न्याय मिळवुन देऊ असा शब्द दिला.
यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना श्री.देवकर म्हणाले की, इपीएस ९५ पेन्शनर्स समितीची मागणी अतिशय रास्त असून, विद्यमान भाजपा सरकार त्यांना न्याय देण्याकरिता टाळाटाळीची व वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक हे सातत्याने ईपीएस ९५ पेन्शनर्स संघर्ष समितीला मदतच करीत आले आहेत.तुमच्या लढ्यास माझाही पाठिंबा आहे, त्यामुळे मी संसदेत गेल्यावर आपल्या रास्त मागण्यांना न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. श्री.देवकर यांना भेटण्यास आलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद भारंबे, सचिव डी.एन.पाटील, जीवन राणे, सतीश वाणी, अनिल हत्तीवाले यांचा समावेश होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज असोदा व परिसरातील गावांमध्ये प्रचार व संवाद रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान देवकर यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी व युवकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देवकर म्हणाले की, आज परिसरात असलेल्या अनेक समस्या रॅलीदरम्यान चर्चा करताना समोर आल्यात. पण सामान्य माणसांचे प्रश्‍न सोडविण्याची आत्मीयताच सरकारकडे नसल्याने खर्‍या अर्थाने ग्रामविकास होवू शकला नाही. गांधीजींच्या तत्वावर चालणार्‍या राष्ट्रवादी पक्षाला आपण मताधिक्य दिल्यास रस्ते, सिंचन व इतर नागरीसुविधा पुरवून आदर्श ग्रामविकासाचे आपले स्वप्न साकार करणे शक्य होणार आहे. प्रचारादरम्यान गावातील हनुमान मंदीर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासह पीरबाबा दर्ग्यावर माल्यार्पण करून श्री.देवकर यांनी वंदन केले. ढोलताशांच्या गजरात व घोषणांच्या निनादात असोदा परिसर राष्ट्रवादीमय झाला होता. प्रचार रॅलीदरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून श्री.देवकर यांचे स्वागत केले.या प्रचार व संवाद रॅलीत गुलाबराव देवकर यांच्यासमवेत माजी आमदार दिलीप सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख गोपाळ पाटील, जि.प.सदस्य रवि देशमुख, माजी सदस्य पंकज महाजन, माजी पं.स.सभापती दिलीप पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, गोकुळ चव्हाण, युवक अध्यक्ष विनायक चव्हाण, कृउबा संचालक प्रशांत पाटील, डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील या पदाधिकार्यांसमवेत उपसरपंच अरुण कोळी, संजय बिर्हाडे, ममुराबादचे महेश चौधरी, नशिराबादचे सरपंच विकास पाटील, असोदा येथील ग्रा.पं.सदस्य हेमंत पाटील, बाळासाहेब पाटील, सुनिल पाटील, अरुण माळी, विजय भोळे, उध्दव पाटील, भास्कर पाटील, बंडू भोळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष धवल पाटील, संजीव पाटील, चित्रनीश पाटील, सागर पाटील, सुरज पाटील, काँग्रेसचे शैलेश पाटील, सलीम पिंजारी, वाहेद खाटीक, अमोदा येथील नवल पाटील, भादली येथील प्रफुल्ल पाटील यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ, कार्यकर्ते व युवक सहभागी झाले होते.

विकासात्मक वचननामा प्रकाशित
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘असे असेल आपले जळगाव’ या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा विकासात्मक वचननामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे, करण खलाटे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप सोनवणे, शिरीष चौधरी, पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रवक्ते योगेश देसले, युवक महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, लिगल सेल जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, कार्यालयीन सचिव संजय चव्हाण, दिपक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.