भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून प्रचार रॅलीचा शुभारंभ
जळगाव – डॉ.आंबेडकर यांनी देशाला दिलेलेे संविधान बदलविणार्या भाजपा सरकारला पुन्हा सत्ता न देण्याचा निर्धार आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी करु या. सकल समाजांचा विचार करुन, देशाचे संविधान लिहिणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलविण्याचा प्रयत्न करणार्या मनूवादी प्रवृत्तींच्या विरोधात आता मतदानरुपी निषेध करणे गरजेचे झाले आहे. राष्ट्रवादी आघाडीला मताधिक्य देवून मनूवाद्यांचा हा डाव हाणून पाडण्यास सहकार्य करा, असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनप्रसंगी केले.
आज सकाळी जळगाव येथील रेल्वेस्थानकासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पारोळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली. यानंतर प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत वंदन केले. माजी खा. वसंतराव मोरे व आ. डॉ.सतीश पाटील यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रचार व संवाद रॅलीला उपस्थित नागरिकांशी बोलताना देवकर म्हणाले की, भाजपाच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता जळगाव लोकसभा मतदारसंघातील सिंचन, रस्ते, रोजगार, उद्योग व्यवसायासह विविध विकास कामांना गती मिळण्यासाठी आता परिवर्तन घडवा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई सह मित्रपक्ष आघाडीला आपल्या शहर व तालुक्यातून प्रचंड मताधिक्य द्या असे आवाहन करण्यात आले.
शहरातील मुख्य बाजारपेठ भागासह विविध उपनगरे व तालुक्यातील आमडदे – गिरड जिल्हा परिषद गटातील विविध गावात ढोलताशांच्या निनादात व घोषणांच्या जयघोषात ही प्रचार व संवाद रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी व्यापारी व व्यावसायिकांनी देवकर यांचे स्वागत केले. या प्रचार रॅलीत देवकर यांच्या समवेत माजी खासदार वसंतकाका मोरे, आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जि.प.सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, कृउबाचे उपसभापती अॅड.विश्वासराव भोसले, डॉ.शांताराम पाटील, राजेंद्र देसले, तालुकाध्यक्ष बाळू पाटील, कृउबा संचालक पराग मोरे, नगरसेवक रोहन मोरे, डॉ.सुरेश पाटील, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, डिगंबर पाटील, संजय बागडे, मनोहर पाटील, राजेश पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील, गणेश पाटील, दिलीप पाटील, हेमराज पाटील, शिवाजी पाटील , शेखर पाटील , भैय्या पाटील , रमेश पाटील , सतिष पाटील, महिला पदाधिकारी माधुरी पाटील, सुवर्णा पाटील, सुनंदा शेंडे, अन्नपुर्णा पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज आ.जयंत पाटील व आ.जितेंद्र आव्हाड यांचा दौरा
लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज (दि.१५) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व नेते आ.जितेंद्र आव्हाड हे मतदारसंघाच्या दौर्यावर येणार आहेत. यादरम्यान ते सकाळी ११ वाजता विराम लॉन्स, चाळीसगाव येथे युवक मेळावा, दुपारी ३ वाजता मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे बुथप्रमुख व पदाधिकारी बैठक घेतल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता ओतारगल्ली पारोळा तर सायं. ७ वाजता शेरा चौक मेहरुण येथे भव्य जाहीर सभा घेणार आहेत. तरी या कार्यक्रमांना आघाडीचे सर्व बुथप्रमुख, पदाधिकारी, युवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी केले आहे.