हिंदुस्थानी मुस्लीम असल्याचा गर्व: गुलाम नबी आझाद

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील खासदारकीचा कार्य्क्कल संपुष्ठात आला आहे. सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आझाद यांचे शेवटचे अधिवेशन आहे. त्यांना यावेळी निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी आझाद यांना निरोप देण्यात आला. आझाद यांच्या निरोपाच्या भाषणावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच भावूक झाले. मोदींना अश्रू अनावर झाले आहोते. दरम्यान गुलाम नबी आझाद यांनीही निरोपाचे भाषण केले.

भारतात मुस्लीम समुदायाच्या लोकांना चांगली वागणूक मिळते. मुस्लीम राष्ट्र असलेल्या देशात मुस्लिमांवर अन्याय सुरु आहे. मात्र भारतात मुस्लीम आनंदी आहे. ‘हिंदुस्थानी मुस्लीम’ असल्याचा गर्व असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये कधी गेलेलो नाही मात्र पाकिस्तानमध्ये मुस्लीम सुखी नाही तेवढे सुखीभारतात आहे असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.