मुनाफ पटेलाच्या हाती बंदूक

0

नवी दिल्ली-एकेकाळी भारतीय जलदगती गोलंदाजीचा कणा मानल्या जाणारा मुनाफ पटेल गेली ७ वर्ष भारतीय क्रिकेटपासून दुरावला आहे. मध्यंतरीच्या काळात आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाकडून मुनाफ मैदानात उतरला होता, मात्र मध्यंतरीच्या काळात मुनाफ सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला होता. मुनाफ पटेलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहा लोकांसोबत बंदूक घेतलेला फोटो पोस्ट केला आहे.

त्याच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मुनाफने तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करताना मुनाफ पटेलने ७ बळी घेत आपला ठसा उमटवला होता. २०११ साली विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही मुनाफ पटेल सदस्य होता. मात्र यानंतर त्याचा फॉर्म हरवल्यामुळे भारतीय संघातलं त्याचं स्थान डळमळीत झाले.