ठिकाणी कारवाई करत सुमारे चार लाख 22 हजार 240 रुपयांचा गुटखा जप्त

शहादा l

राज्यात वाहतूक व विक्री प्रतिबंध असलेल्या विमल गुटखा व सुगंधित पानमसाला तस्करांवर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दोन ठिकाणी कारवाई करत सुमारे चार लाख 22 हजार 240 रुपयांचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तिघां विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात विमाल गुटका सुगंधित पान मसाला वाहतूक विक्री ला राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे असे असले तरी मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात या गुटक्याची तस्करी राजरोसपणे सुरू असून सर्रासपणे शहरात थोड्या थोड्या अंतरावर गुटख्याची विक्री होत आहे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवत यांनी पदभार स्विकारल्यानंतर आज दुपारी शहादा दोंडाईचा रस्त्यावर कल्याणी डेअरी समोर विमल गुटख्याची वाहतूक करणाऱ्या योगेश गुलाब भोई व प्रकाश गुलाब भोई या दोघांना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातुन सुमारे 72 हजार 240 रुपयाचा गुटखा जप्त केला आहे

दुसरी कारवाई शहरातील मेमन कॉलनी परिसरात एका गोदामावर केली असून तेथून सुमारे तीन लाख 41 हजार रुपयांचा विमल गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त केला आहे या दोन कारवाई सुमारे चार लाख 24 हजार 240 रुपयांचा प्रतिबंधित गुटका जप्त करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे रात्री उशिरापर्यंत तिन्ही संशयित आरोपीत विरोधात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान शहादा पोलिसांनी आज अचानक विमल गुटखा तस्करांवर कारवाईचे सत्र सुरू केल्यानंतर गुटका तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक तस्कर शहरातून फरार झाले आहेत तर अनेकांनी त्यांच्या ताब्यातील गुटखा शहराबाहेर सुरक्षित स्थळी हलाविला आहे पोलिसांनी केवळ खानापूर्ती म्हणून गुटखा तस्करांवर कारवाई न करता यामागील मास्टर माइंड प्रमुख सूत्रधाराला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली असुन गुटखा तस्करांनी माजविलेला थैमान कायमस्वरूपी मोडून काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे