हैद्राबाद –ग्वालियरमध्ये आंधप्रदेश एसी एक्स्प्रेसला आग लागली आहे. ही एक्स्प्रेस दिल्लीहून विशाखापट्टणमला जात होती. ग्वालियरमधील बिर्ला नगर रेल्वे स्टेशनवर ही आग लागली असून आगीत एक्स्प्रेसचे चार डबे जळून खाक झाले आहेत. सुरुवातीला एका डब्याला लागलेली ही आग चार डब्यांपर्यंत पसरली. दरम्यान आग लागल्याने एक्स्प्रेस थांबण्यात आली असून, लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आगीत एक्स्प्रेसचे प्रचंड नुकसान झाले असून, सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. एसीमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे
Fire breaks out in 4 coaches of Rajdhani Express near Birlanagar station in Gwalior. Fire tenders present at the spot #MadhyaPradesh
— ANI (@ANI) May 21, 2018