जामनेर प्रतिनिधी l
)जामनेर येथील श्री. ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी चा निकाल ९६.७७ टक्के लागला असून कु. जयश्री यशवंत राठोड ही ८१.२० टक्के मिळून विद्यालयातून प्रथम आली आहे. तर कु.संजना सुभाष कुमावत ही ८१.०० टक्के मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली . आणि कु. साक्षी रविंद्र चिमणकर ही ७९.०० टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.विद्यालयातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक एड. शिवाजी सोनार यांनी पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष मा ना गिरिश महाजन ( ग्रामविकास व युवक कल्याण क्रीडा व वैद्यकीय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य) व विद्यालयाच्या सचिव सौ. साधनाताई महाजन (मा.नगराध्यक्षा न.प.जामनेर) सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.सोनवणे व सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे