हाफिज सईदच्या पक्षाला एकही जागा नाही

0

लाहोर-पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत हाफिज सईदच्या ‘अल्लाह-ओ-अकबर तेहरीक’ या पक्षाला एकही जागा जिंकता आले नाही. हाफिज सईद हा मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्याने स्वतःचा पक्ष काढला त्यावेळी त्याच्यावर टीकाही झाली होती.

पाकिस्तानत पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये निवडणुकांमध्ये दोन चेहरे महत्त्वाचे मानले गेले आहेत. ज्यामध्ये इमरान खान यांना पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जाते आहे. तर दुसरे चर्चेतले नाव आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ. दहशतवादी हाफिज सईद याने जेव्हा त्याचा पक्ष सुरू केला आणि उमेदवार उभे केले तेव्हा पाकिस्तानची जनता त्याला कौल देणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता ज्याचे उत्तर आज मिळाले आहे. पाकिस्तानी जनतेने मतपेटीतून हाफिज सईदला साफ नाकारले आहे.