दिव्यांगांना घरे बांधून देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन

0

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड पालिकेने दिव्यांगांसाठी घरे बांधून देण्याची मागणी करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या अंपग सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांच्या प्रशिक्षणासाठी पालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात अनेक शाळा आहेत. तेथे प्रशिक्षण केंद्र चालू करावे. त्यामुळे दिव्यांगांना उत्तम सोय होईल. तसेच दिव्यांग भवन बांधावे किंवा नाही, यासाठी दिव्यांग नागरिकांडून हरकती सूचना मागवाव्यात. याबाबत येत्या आठ दिवसात योग्य तो निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी अंपग सेल कायदेशीर मार्गाने विरोध करेल, असे याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यांची होती उपस्थिती
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील व अपंग सेलचे अध्यक्ष अशोक कुंभार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विजय लोखंडे, कविता खराडे, गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, आनंदा यादव, यतिन पारेख, निलेश डोके, अरुणा कुंभार, शिला भोंडवे, शिल्पा बिडकर, शहजादी सय्यद, सलीम सय्यद, सविता धुमाळ, वंदना जाधव, उत्तम आल्हाट, रूपाली गायकवाड, महादेव वाघमारे, महेश वाघ, सुधाकर कांबळे, विजय शिंगे, राजू हिरवे, गाडेकर, बाबाजी चव्हाण, सुनील अडागळे आदी सहभागी झाले होते.