लष्कराच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

कुपवाडा :- जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर जोरदार हल्ला केला. यावेळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी त्वरीत शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, या चकमकीत दोन दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. शोध मोहिमेदरम्यान त्यांचे मृतदेह आढळून आले.


 

दहशतवाद्यांचा नेत्याच्या घरावर हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बुधवारी सांयकाळी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अश्रफ भट्ट यांच्या घरावर ग्रेनेड लाँचरने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर त्रालमध्ये लष्कर आणि एसओजीच्या पथकाकडू या दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सुरक्षा पथकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २७ मे रोजी दहशतवाद्यांनी पुलवामातील काकपोरा येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता तर एक स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाला होता. शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कराच्या एका कॅम्पवर निशाणा साधला होता. त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आणि विविध ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.