#Happy Birthday Modi: विरोधकांकडूनही मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मोदींवर भारतातूनच नाही तर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियात तर आज मोदींच दिसत आहेत. भाजप नेत्यांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव तर होतच आहे, परंतु विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील मोदींचे अभीष्टचिंतन केले आहे. एरवी एकमेकांवर तोंडसुख घेणारे नेत्यांनी राजकारण दूर सारत दीर्घायुष्याची प्रार्थना केली. एरवी सातत्याने मोदींवर निशाणा साधणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाकडून सेवा सप्ताह साजरा होत आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. ट्विटरवरून सातत्याने हल्लाबोल करत आहेत. मात्र आज राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.