नवी दिल्ली: सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळणारा भारताचा दिग्गज गोलंदाज हरभजनसिंग आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५० बळी घेतले आहे. हरभजनसिंग आयपीएलमध्ये सुरुवातीला मुंबई संघाकडून खेळत होते. त्यानंतर त्यांना चेन्नईच्या संघात घेण्यात आले. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे.