खेळ रत्न पुरस्कारासाठी हरभजन सिंगचा अर्ज फेटाळला

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याचा खेल रत्न पुरस्कारासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच धावपटू द्युती चंद आणि आशियाई पदक विजेता धावपटू मनजीत सिंह यांचा अर्जुन पुरस्कारासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाने खेल रत्न व अर्जु पुरस्कारासाठीच्या खेळाडूंच्या नावाची यादी तयार केली आहे. ती लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

बीसीसीआय गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली होती. यावर्षी बीसीसीआयने खेल रत्न पुरस्कारासाठी कोणाचेही नाव पाठवले नाही. पंजाब सरकारने हरभजनच्या नावाची शिफारस केली होती. पण, त्याच्या नावाच्या शिफारसीचा अर्ज 25 जूनला पाठवण्यात आला, परंतु यासाठी 30 एप्रिल ही डेडलाईन होती.