हार्दिक पांड्या, के.एल.राहुलचा ‘तो’ एपिसोड हॉटस्टारवरून डिलीट!

0

नवी दिल्ली-‘कॉफी विथ करण ६’ या करण जोहरच्या प्रसिद्ध शोमुळे भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या व के.एल.राहुल चांगलेच वादात सापडले आहे. हार्दिक पांड्या यांनी महिलांबाबत केलेल्या अपमानजनक व आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर बीसीसीआयने सामना खेळण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान हार्दिक पांड्या, के.एल.राहुलचा तो एपिसोड हॉटस्टारवरून काढून टाकण्यात आला आहे. स्टार वर्ल्ड या वाहिनीनेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या एपिसोडचे सर्व टीझर आणि फोटो काढून टाकले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीत समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील शिक्षा सुनावण्यात येईल.