केंद्रीय मंत्र्याने केली पांड्या, के.एल.राहुलची पाठराखण; म्हणाले कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न !

0

नवी दिल्ली : कॉफी विथ करणच्या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना बीसीसीआय, आयसीसी आणि राज्य संघटनांच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. दरम्यान पांड्या आणि के.एल.राहुलच्या मदतीला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो धावून आले आहे. त्यांनी ट्वीटकरत पाठराखण केली आहे.

प्रशासकीय समिती आणि बीसीसीआय या प्रकरणाचा तपास करत आहेत. असे असताना एडुल्जींचे हे विधान म्हणने पांड्या व राहुल यांची कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न असल्याची टीका केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी केली. त्यांनी एखाद्याला ताकीद देणे आणि कारकीर्द संपुष्टात आणणे यामधील बारीक रेषा एडुल्जी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ”डायना एडुल्जी यांनी भारतीय क्रिकेटला दिलेलं योगदान मोलाचे आहे. त्यांचा मी आदर करतो, परंतु त्या अजुनही जुनाट विचार सोबत घेऊन चालत आहेत. पांड्या जे काही म्हणाला ते निषेधार्ह आहे, परंतु त्यासाठी या युवा खेळाडूंच्या कारकिर्दीशी खेळणे चुकीचे आहे”, असे सुप्रियो यांनी ट्विट केले.