हार्दिक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा

0

गांधीनगर-गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना बुधवारी न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

याशिवाय त्यांना भाजपा आमदार ऋषिकेश पटेल एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने याप्रकरणात हर्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य एकाला दोषी ठरवले आहे.

मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगरमध्ये २३ जुलै २०१५ रोजी भाजपा आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. यापूर्वी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले होते.