हार्दिक पटेल यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

0

अहमदाबाद : गुजरातच्या पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल हे आमरण उपोषणाला बसले आहेत, या आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे. आज दुपारी त्यांची प्रकृती खालावल्याने अहमदाबाद येथील सोला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाटीदार समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या मागण्यांसाठी हार्दिक पटेलने 25 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

10 व्या दिवसानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. चालण्य़ासाठी त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे. गुरुवारी त्यांनी पाणी पिण्यासही नकार दिला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पटेल यांचे शेकडो समर्थकही हॉस्पिटलबाहेर दाखल झाले आहेत.