चंदीगढ- इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगटला या दोघांना हरयाणा सरकारने ३ कोटींचे इनाम जाहीर केले आहे. याचसोबत ट्रॅप नेमबाजीत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य शेरॉनलाही बक्षिसे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लक्ष्यला दीड कोटींचे इनाम घोषित करण्यात आलेले आहे. हरयाणा सरकारचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
Congratulations to #VineshPhogat for winning Gold Medal in wrestling in #AsianGames2018 Haryana Government will honour her with Rs. 3 Crore of cash award and a job of HCS/HPS
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) August 20, 2018
विनेश फोगाटने अंतिम फेरीत जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-२ ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीसोबत विनेश आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर लक्ष्य शेरॉननेही पदार्पणातचं रौप्य पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या दिवशी बजरंगने जपानी प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत सुवर्णपदक पटकावलं होतं.