चंदीगढ-हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये अवघ्या एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पतौडी तालुक्यातील ब्रीजपुरा गावामध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले आहेत.
एका चिमुकलीचा मृत्यू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना झाला. तर, एका महिलेचा मृतदेह मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आणि अन्य दोन मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत होते. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप संभ्रम असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.