इंदापूर: हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीत बाजी मारली असून १७ हजार पेक्षा जास्त मतांनी त्या निवडून आल्या आहेत. बावडा, लाखेवाडी जिल्हा परिषद जागेवरुन त्यांचा विजय झाला आहे. या ठिकाणी २३ जून रोजी मतदान घेण्यात आले होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून अंकिता पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या राजकिय प्रवेशाने घराण्याची तिसरी पिढी राजकारणात दाखल झाली आहे.